STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Comedy

3  

Shraddha Kandalgaonkar

Comedy

जादू

जादू

1 min
135

तूझ्या नजरेतल्या आव्हानाची ,

तूझ्या स्पर्शातल्या आवेगाची ,

तूझ्या केसातल्या नगिणीची ,

तूझ्या अधरातल्या रसाची ,

तूझ्या चालण्यातल्या लईची,

तूझ्या आवाजातल्या नादाची ,

तूझ्या सहवासाच्या नशेची ,

जादू 

माझ्यातल्या आशिकाचा

एका क्षणात पराभव करते...

माझ्यातल्या शरणागताचा 

जेव्हा तू स्वीकार करतेस 

तेव्हा जणूकाही परिसाचा

स्पर्श होऊन माझ्या जीवनाचे 

सोने होते.

अन् कुठल्यातरी निसटत्या

क्षणी माझ्यातल्या मी ला

तूझ्या स्वाधीन करून

मी तुझ्या आधीन होतो.


मग काही वर्षांनी...


बाळा जादू बिदू काही नसते

असते फक्त नजरबंदी..

तु वयात येताना सांगतो

तुला अनुभवाचे बोल

नजरेच्या जाळ्यात

अडकलेल्या जीवाला 

नसते काही मोल..

केसातली नागिण

कधी सोडेल वेढा,

ह्याच विचारात जातो,

अर्ध्या आयुष्याचा

जितं जितं करत 

हरलेला लढा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy