STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational Romance

5.0  

manasvi poyamkar

Inspirational Romance

इतके सोपे असते का सारे

इतके सोपे असते का सारे

1 min
14.3K


कळत नकळत घडावे

इतके सोपे असते का सारें

गवसतो का चन्द्र कधी

येतात का मुठीत तारे

खरच होतो का स्पर्श गुलाबाचा

वाहतात का प्रेमाचे वारे

कळत नकळत घडावे

इतके सोपे असते का सारे ....

खरंच असतो का सहवास प्रेमळ

खरच रडवते का विरहाची कळकळ

खरच व्याकुळ करते का आठवण

हृदयी होते का क्षणांची साठवण

खरंच असतात का नयनांचे पहारे

कळत नकळत घडावे

इतके सोपे असते का सारे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational