STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Fantasy Others

3  

Sheshrao Yelekar

Fantasy Others

इंद्रधनू

इंद्रधनू

1 min
14.9K


आकाशाने रंग उधळले

सात रंगांचा इंद्रधनू

चहू दिशांना सुगंध येतो

चला प्रफुल्लित फुले विणू


सात सुरांच्या गीतातून

सात नवे रंग पडे

निसर्गाच्या कुशीत

आकाश वसुंधरेचा मिलन घडे


सांजवेळी रुप खुलले

इंद्रधनू च्या पदरात

नववधु लाजावी

पती देवाच्या कवेत


सप्त रंगाला गाली लावून

सुर्य नारायण शांत झाला

पावसाच्या रिमझिम नादात

वसुंधरेला रंग चढला


धरती मातेच्या पुत्रांनो

आनंदाचा वर्षाव करु

एक एक झाड लावून

पर्यावरणाची कास धरु




Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy