होय, मी समुद्र बोलतोय..
होय, मी समुद्र बोलतोय..
होय ,मी समुद्र बोलतोय..
खूप मोठा आहे मी
पण माझा मोठेपणा
मी कधीही दाखवत नाही
आणि तुम्ही सारखा तुमचा
मोठेपणा मिळवत बसता..
होय, मी समुद्र बोलतोय
खूप शक्तिशाली आहे मी
पण माझी शक्ती मी
विनाकारण उपयोगात
आणत नाही आणि
तुम्ही नुसता तुमच्या शक्तीचा
दुरुपयोग करता..
होय, मी समुद्र बोलतोय
खूप मर्यादित असतो मी
आणि माझी मर्यादा
मी कधीच सोडत नाही
तुम्ही मात्र बिनधास्त
तुमच्या मर्यादा ओलांडता..
होय, मी समुद्र बोलतोय
खूप निस्वार्थी आहे मी
कारण जी वस्तू माझी नाही
तिला मी किनाऱ्यावरच सोडतो
आणि तुम्ही तुमची
नसलेली वस्तू सुद्धा
कवटाळून बसलेले असता..
होय, मी समुद्र बोलतोय
खूप हिम्मत आहे माझ्यात
असंख्य जीवांचा निवारा बनायची
आणि तुम्ही एक जीव सुद्धा
सांभाळू शकत नाही..
होय, मी समुद्र बोलतोय
खूप मोठं मन आहे माझं
माणूस जरी नसलो तरी
कारण माझ्या किनारी
जो येतो तो आनंदी
होऊन जातो आणि
तुम्ही दिला आहे का
कधी कुणाला थोडा तरी आनंद?
होय, मी समुद्र बोलतोय..
