होळी पूनव
होळी पूनव
सण आला गो, आला गो,होळीच्या पूनवेचा माझ्या नाखवा रं, नाखवा रं ,तू राजा दरियाचा
सण वर्षाचा, चल करू साजरा,जोडीने शिमग्याचा माझ्या राजा रं,
तू रंगव मला,धनी माझा तू कुंकवाचा
किती हौशीनं, अंगणात होळी तू बांधली त्याच्या भवतीनं रंगांची मी रांगोळी काढली
पोराबाळांनी सजिवला थाट हा होळीचा आज नैवेद्य बनवला मी पुरणाच्या पोळीचा
सोंगे शिमग्याची घेऊन, पोरं फिरती भोवती कुणी वाघोबा, कुणी सिंहाचा मुखवटा घालती
कुणी जोमानं शिमग्याच्या बोंबाही मारती बघ आली ह्या सर्वांच्या उत्साहाला भरती
गे हौलू बाय, दे आयुष्य उदंड धन्याला बोट त्याची गं दूर जाऊदे उद्या दर्या किना-याला
ओटी तुझी मी भरिते आज होळीच्या पूनवेला
वाण सौभाग्य मागते लेक होलिका आईला