हिवाळा
हिवाळा
हवेतला झोंबे गारवा
तरीही वाटे हवा हवा
ऋतू मागून ऋतू येती
प्रत्येकाची वेगळी महती ...
सुर्यकिरण पडती सोनेरी
अंगावर जशी शाल भरजरी
पक्षी मनोहर गाणे गाती...
उबदार शालीला महत्व लगेच
भाव खाऊन जाते ती उगाच
लपेटून अंगावर थंडीला पळविती...
गरम भज्यांवर ताव मारून
चटपटीत खाण्याचा मोह आवरून
गरम चहाचा घोट घेती....
दिवसही जातो थोडा संकोचून
रात्र घेते महत्त्व खेचून
ओढून पांघरूण झोप घेती...