#गाव
#गाव
नदीच्या पैलतीरी आहे एक गाव
पाण्यातून ये जा करतोय सारा गाव
लहान थोर येथे नांदती गुण्यागोविंदाने
एकमेकांना मदत करती सढळ हाताने
नाही इथे रंक कुणी ना कुणी राव
नदीच्या पैलतीरी आहे एक गाव
'अतिथी देवो भव 'म्हणत देती गुळ पाणी
राहणी साधी पण आहे उच्च विचारसरणी
या गावाची तर्हाच न्यारी पैशासाठी नाही लाचारी
मिळेल तेवढे आनंदात मिळून मिसळून खातात
भले बुरे विसरून संकटकाळी घेती धाव
नदीच्या पैलतीरी आहे एक गाव