उधळण
उधळण
1 min
8
हिरव्या हिरव्या रंगाची
उधळण होई धरेवरी
लेउन हिरवा शालू
शोभतो पदर खांद्यावरी
झुळूक हळूच येता
गुदगुल्या होती गवतावरी
आनंदे डोलते पाहुनी
भ्रमर बसे पानांव री
हिंदोळ्या सवे घेत हिंदोळा
झुले झोपाळ्यावरी
हिरव्या रानात जशी
उतरली अप्सरा भूवरी
कष्ट वेदना विसरून
होई आनंदी शेतकरी