दिवाळी
दिवाळी
सण वर्षाचा आहे मोठा
नाही आनंदाला तोटा.
धावपळ सासुरवासिनींची
ओढ माहेरी जाण्याची.
लावून घरोघरी दीप
प्रकाश पसरतो अमाप.
फटाक्यांची आतषबाजी
स्पर्धा जशी आकाशाशी.
रंगीबेरंगी फुल बाजा
बाळ गोपाळांची मजा.
गोड धोडाचे सर्वत्र जेवण
ताव मारती सर्वजण.
हशा आनंद पसरतो चोहिकडे
विसरून जाती आपले दुखडे.
अंधाराला टाकती झुगारून
मळभ मनातले जाते विरून.
चार दिवसांचे वेगळेपण
टिकवू आपण साजरे करून.