#गडद रहस्य
#गडद रहस्य
1 min
9
तो चंद्रमा नभीचा
खुलवी गुपित मनीचे.
प्रकाशून या धरेला
धडे देई शांततेचे.
हास्य ते मुखमंडली
पाहता तवलोचनी.
माय मायचे हात
फिरता डोक्यावरूनी.
होता तिन्ही सांज
उगवला रवी.
हसून ओठांतून निघते
आपसुक ओवी.
पुनवेचा चंद्र करवी
त्या बाळलीला.
गाऊन अंगाई माय
झोपवि तान्हुल्याला.
पुनवेच्या चंद्राचे हास्य
असे ते खळखळून.
अमावस्येला होत जाते
गडद अंधारून