हीच आमुची प्रार्थना
हीच आमुची प्रार्थना
हिंदू - मुस्लिम शीख इसाई
भारतभूमीचे पुत्र आम्ही
विसरू सारी व्यर्थ भ्रमंती
जिव्हाळ्याची जोडूया नाती
नानाविध प्रांत भाषा जरी
परस्परांचा हात हाती घेऊ
पुन्हा नव्याने एक होऊ
मानवतेवचे गीत गाऊ चला
अंगिकारू न्याय समता बंधुता
राग द्वेषा मूठमाती देऊ आता
आशेच्या या क्षितिजावरती
आकांक्षारूपी तारे विसावती
प्रेम देऊ प्रेम घेऊ परस्परा
पुन्हा जन्म नाहीच नंतर
जगणे होवो नितांत सुंदर
हीच आशा, हीच आमुची प्रार्थना
