STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

4  

Supriya Devkar

Inspirational Others

हि रात्र शिकवते मजला

हि रात्र शिकवते मजला

1 min
284

हि रात्र शिकवते मजला 

सादर होणे आव्हानांना 

न डगमगता पेलणे सारे

थांबवत सार्या भावनांना 


हि रात्र शिकवते मजला 

आशादायी असावे वागणे

तरच होईल सुखकर तुमचे

खाचखळग्यांचे जगणे 


हि रात्र शिकवते मजला 

अविरत पूढे चालणे

थांबलेल्या क्षणांपासून 

पुन्हा नव्याने धावणे 


हि रात्र शिकवते मजला 

उदासी झटकून देणे

नवनव्या ज्ञानाची पोतडी 

ओजंळीत आपल्या घेणे 


हि रात्र शिकवते मजला 

जगावे सारे पाश सोडून 

बघ होणार ऊद्याला पहाट 

मोहमायेचे विळखे तोडून 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational