हॅलो हॅलो गणपती बाप्पा....
हॅलो हॅलो गणपती बाप्पा....
हॅलो हॅलो गणपती बाप्पा
आपण मारू का हो थोड्या गप्पा
तुमची सोबत दहा दिवसाची
नव्हती वाटत भिती कशाची
हॅलो हॅलो......
तुम्ही गेले तुमच्या गावाला
पप्पा मम्मी पण गेले आँफीसला
फ्लॅटमध्ये आता मी एकटा
चालतो आयाच्या तोंडाचा पट्टा
हॅलो हॅलो.....
पाहू कितीतरी मी टिव्ही
कॉम्प्युटरवरील तो मुव्ही
अभ्यासाचा पाडला मी फडशा
नको वाटतात ह्या गोष्टी आताशा
हॅलो हॅलो.......
बाप्पा तुम्ही आले आमच्या घरी
पंचपक्वान्ने रोज मम्मी करी
मोदकाची चव किती न्यारी
म्हणून आवडती तुम्हा ती भारी
हॅलो हॅलो......
वाट पाहते का तुमची आई
म्हणून जाता तुम्ही घाई घाई
लवकर याहो पुढल्या वर्षीही
तुमच्या येण्याची वाट मी पाही
हॅलो हॅलो....
