STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

हे गणेशा, हे गौरीनंदना

हे गणेशा, हे गौरीनंदना

1 min
27.9K



हे गणेशा, हे गौरीनंदना

स्वीकार आमुची प्रार्थना.....॥धृ॥


आम्हां दिलेस जीवन

आयुष्य केलेस पावन

करतो तुला नमन

तू गणपती, तू गजवदना.....॥१॥


आम्ही तुझी लेकरे

जशी चिमणी पाखरे

तूच सर्वांचा आहे बाप रे

तू गजकर्णा, तू गजानना.....॥२॥


होऊ दे आम्हां सबळ

वाढो बुद्धी प्रबळ

मनगटात यावे बळ

मनोभावे करतो वंदना.....॥३॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational