हायकू : कार्यशाळा ती
हायकू : कार्यशाळा ती


कार्यशाळा ती
जे संपादिते ज्ञान
जागते मान
कार्यशाळा ती
ज्ञान देते काव्याचे
पद्मगंधाचे
कार्यशाळा ती
भावनेच्या उदरी
काव्य भरारी
कार्यशाळा ती
प्रकाशते किरणं
अंत:करणं
कार्यशाळा ती
जागली पीर हृदयी
मनामनाची
कार्यशाळा ती
धारा झरझरते
काव्यरसाचे
कार्यशाळा ती
देते अंतरी सुख
सरते दुःख
कार्यशाळा ती
केले मुग्ध भाव
माझे गाव
कार्यशाळा ती
निखळ हास्य धुंदी
होऊनी छंदी
कार्यशाळा ती
भरले नव रस
हवे हवेसं...