हात तुझा माझ्या हाती
हात तुझा माझ्या हाती
हात तुझा माझ्या हाती
नित्य असावा असाच
ऊब प्रेमाची हृदयी
बहरी तू दिसताच
आयुष्य हे पोरकट
सारथी तू जीवनाचा
वचनी सांभाळ गोडी
हाक रथ आयुष्याचा
सुंदर प्रेमाचा मळा
संगतीने रे फुलला
मोहरली जाई-जुई
निशिगंध सुखावला
हात तुझ्या माझ्या हाती
जन्मोजन्मी तुच साथी
पाठीराखा तूच माझा
मागणी ही देवापाशी
डोळ्यातं वात्सल्य तुझ्या
ऊर्जा देई जीवनाची
संकटाला मात देई
बाणगी निडर तेची
रुबाब कणखर तो
आहे पावलोपावली
तुझ्यासंगे पालखी ती
धुंद होऊन निघाली
साथ तुझी धीर देते
सामना तो संकटाचा
ठाम जसा वटवृक्ष
मुकुट तो शिखराचा
जीवनाच्या समुद्रात
हाकु नाव पैलतीरी
पार करू किनारा हा
पोहून भवसागरी
कवयित्री नालंदा वानखेडे
नागपूर
