STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

4  

Pandit Warade

Inspirational

गुरू (अभंग)

गुरू (अभंग)

1 min
354

जगी धन्य झाला । नर जन्मी आला ।।

भाग्य उदयाला । आले त्याचे ।।१।।


ज्याचे जीवनात । गुरू कृपावंत ।।

तोच भाग्यवंत । जगी थोर ।।२।।


स्पर्श लोखंडास । होय परीसाचा ।।

गुण कनकाचा । तया अंगी ।।३।।


परीसा परिस । गुरू श्रेष्ठ खास ।।

करिती शिष्यास । स्वतः जैसे ।।४।।


काढून अज्ञान । गुरू देती ज्ञान ।।

बनतो महान । शिष्य थोर ।।५।।


करुनि संस्कार । देतात आकार ।।

जीवन साकार । करे गुरू ।।६।।


वंदनीय गुरू । जणू कल्पतरू ।।

मनोभावे करू । सेवा त्यांची ।।७।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational