STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

गुण गाईन आवडी

गुण गाईन आवडी

1 min
209

भक्त तुझी लक्ष्मी माता

दिव्य तुझे रुप भासे!!

गुण गाईन आवडी

मनी तुझे रूप वसे !!


येते धावून नेहमी

देवी तूच भक्तांसाठी!!

सेवा करीती सकल

तुझ्या आशिर्वादासाठी!!


कधी पार्वती न सिद्धी

देवी माता सरस्वती!!

तर कधी माता रिद्धी

तर कधी भगवती!!


गुण गाईन आवडी

नित्य तुलाच स्मरावे!!

तुझ्या नामाचा महिमा

माता तल्लीन रहावे!!


जोडी स्वर्गी विष्णू रमा 

ध्यान तुझे देवी होता !!

लाभ होतो निरंतर

तुज भक्तीत मी आता!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational