गृहविलगीकरण
गृहविलगीकरण
गृहविलगीकरण यामध्ये
मजा आहे भारी
राहायला मिळतं दिवसभर
आपल्याला आपल्या घरी
नसेल काही लक्षण
तर त्रास होत नाही
सगळं मिळतं हातात
घरात काम पडत नाही
नाही लोकल पकडायची
नाही ऑफिस गाठायचं
लॅपटॉप वर लॉगिन करून
जमेल ते काम करायचं
आधी ताप यायचा
पण रजा मिळायची नाही
थोड अंग दुखलं
तरी सांगायची सोय नाही
आता जर सांगितलं
की वाटत नाही थोडं बरं
बॉस म्हणतो तुझच काय
आता माझं पण नाही खरं
घाई नाही ऑफिसला जायची
वाटेल तेवढं घरी थांबायचं
सतत धावणाऱ्या मुंबईत
हे सुख अभावानेच मिळायचं
