गर्द या सावलीत
गर्द या सावलीत
गर्द या सावलीत
घेऊ विसावा घडीभर
खाऊ चटणी न भाकर
निजू थोडी घटिका
मग लावू रोपवाटिका
गर्द या सावलीत
मुले येतील आडोशाला
उन्हात खेळून येतील सावलीला
बसतील शांत जरा
होतील थंडगार
गर्द या सावलीत
थकून येतील माऊली
मिळेल त्यांना थंड सावली
डबे खातील तृप्त होतील
परत आपल्या कामी जातील
गर्द या सावलीत
घेऊया मनसोक्त प्राणवायू
झाडे घेतील कार्बनडाय अॉक्साईड वायू
योगा,प्राणायाम करूया
सर्वांगीण विकास करूया
