Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yeshoda Patil

Inspirational

3  

Yeshoda Patil

Inspirational

गणराया देव माझा

गणराया देव माझा

1 min
208


नित्य अजर अमर

अविनाशी ज्याचे कुळ

गणराया देव माझा

गळा मोतीयांची माळ


पायी वाजती पैंजण

हाती मोदकाची थाळ

दुध दुर्वा बेल फुल

जाश्वंदीने शोभे भाळ


आदय पुजेचा सन्मान

रिध्दी सिध्दीचा ग पती

माझ्या या गणरायाची

मुसकावरती भ्रमंती


लंबोदर ज्याचे नाव

माथा शोभते किरीटं

वक्रतुंड महाकाय

लावू चंदनाची उट


निर्गुण तो निराकार

झाला सगुण साकार

भक्तासाठी मायबाप

आला घेऊन आकार


ब्रम्हा विष्णू महेश्वर

यांचा असेल तो बाप

आहे त्रैलोक्याचा स्वामी

हरी भक्तांचा तो ताप


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational