घोरणे-एक सत्र
घोरणे-एक सत्र
सुरू होते घोरण्याचे सत्र
झाकता झोपेने नेत्र
त्रासदायक बनते ही सवय
वाटे हिचे साऱ्यांना भय
नकोशी वाटणारी ही एक गोष्ट
इतरांना झोपताना घ्यावे लागतात कष्ट
घडते ही क्रिया अगदी गुप्त
उठता आपण होते लुप्त
जाणीवच होत नाही तीळमात्र
नको वाटे जायला इतरत्र
काय होईल कळले सर्वत्र जर
हशाच पिकेल साऱ्यांत मगतर
विश्वासच बसत नाही सांगण्यावर
काय करावे कळत नाही ह्या घोरण्यावर
घोरण्यामुळे अडकून राहतो श्वास
भविष्यात होतो शारिरीक त्रास
शरीर आहे आपले यंत्र
गाढ झोपेचे बिघडते तंत्र
द्या आरोग्याकडे आजच लक्ष
राहुनी थोडे कर्तव्यदक्ष
