STORYMIRROR

kishor zote

Comedy

2  

kishor zote

Comedy

घोळ....

घोळ....

1 min
2.7K


कॉलेजमधे आज ती दिसली

पाहुण मजकडे ती हसली

हसली मुलगी ती फसली

म्हणून लिहली तीला चिठ्ठी

 

वाचून ती ही खूप खुष झाली

एल आर रुम मधे कुजबुज ही

मन वाऱ्यावर क्षितीज तीरी

स्वर्ग राहीला जणू चार बोटावरी

 

मात्र त्यानंतर मला न भेटली

काहीच कसे का न बोलली?

कॉलेजात नित्य ती येत होती

पण दुसऱ्या सोबतच फिरत होती

 

मला असे कळले होते

तीचे त्यावर मन जडलेले

त्याची च ती वाट पाहत होती

मग चिठ्ठी माझी का स्वीकारली?

 

पण झालेला घोळ मित्रांनो

आता कुठे मला कळला होता

मी ज्या नावाचा होतो...........

......................................

तोही त्याच नावाचा होता

तोही त्याच नावाचा होता


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Comedy