गहिरे प्रेम
गहिरे प्रेम
रंग सुंदर
गहिर्या प्रेमाचा
गुलाबी रंगाचा
वाटे आदर ...
तुझ्या प्रेमात
आकंठ बुडाले
माझी न राहिले
वेगळी जात ...
भाव भावना
तुझ्यात गुंतल्या
मनात रूजल्या
कशा सांगना !!
ओढ मनाला
तुझीच लागली
तेढ न उरली
त्या हृदयाला ...
दोघं आपण
एकरूप क्षण
सरले मीपण
झालो दर्पण ...