STORYMIRROR

Kothekar yogita Sanjay Kothekar

Inspirational

5.0  

Kothekar yogita Sanjay Kothekar

Inspirational

गौरव गीत

गौरव गीत

1 min
1.4K


सावरकरांच्या त्यागाची ,

गाऊ कशी महती

झटलास तू विनायका

देशसेवेसाठी ॥


तेरा वयात रचना लिहूनी

दाखविली चमक बुदधीची

सुराज्य व स्वांतत्र्यासाठी

मशाल घेतली क्रांतीची ॥


अभिनव संघटनेचे

सुरू केले क्रांतिपर्व

पुण्यात केली होळी

विदेशी कपडे पेटवूनी सर्व॥


पिस्तुले आणून भारतात

घडविला वध जॅक्सनच

राजद्रोहपर लिखाण करुनि ,

अवलंब अंदमान शिक्षेचा ॥


मरण प्राय वेदना सोसूनी

महाकाव्य उमटली भिंतीवर

जयोस्तूते ही काव्यरचना

केली मातृभूमीवर ॥


सौ.कोठेकर योगिता संजय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational