गावरान प्रेम
गावरान प्रेम
नये नये प्रेम केल
वाटलं लय भारी
त्याच्या संग तीन कराव
म्हनलं एखादी वारी
फटफटीवर त्याच्या
माग बसून घुमाव शहर
पण बापच आला मधात
झाला लयचं कहर
कालिज च्या बाहिर थो
वाट पाहे मावाली
चोरुनच पाहो मी
सोबतिन राहे ना खाली
पाणी भारासाठी जावो
गुंड घेऊन हापशिवर
ड्रेस नाही घालो आमी
राहो फूल मॅक्सिवर
थो बी ये तिथचं
बकेट आपली घेऊन
घसा राहे कोरडा
गडवा भर पाणी पवून
काळाच्या अओघात
झाली आमची ताटातुट
थो कुठं मी कुठं
झाली फाटाफ़ूट
लेकर झाले मोठे माहे
आज मले कयते
मायबापाचा जीव
कसा कसा जयते
