गारवा
गारवा
नकळत्या वयात ही,
सर्व उमगत गेलो,
बेवारस मी,
इथे तिथेे पडलो,
न मार्ग सापडे,
न दीशा ओळखे,
अनामिका मी,
पुढे चाललो,
अनोळखी जगाची,
भीती वाटते,
मायच्या पदराची,
उणीव भासते,
एक थांबा अचानक,
मज खुणावतो,
स्पर्श मायेचा,
मनी गारवा पसरवतो,
तो गारवा उरी,
बाळगत गेलो,
सिंधुताई तुझ्या,
कुशीत विसावलो,
माझ्यासारखेच कित्तेक,
तुझी कूस शोधे,
त्या गारव्याची ,
जीवा आस लागे,
तू नसलीस तरी,
तुझा वसा आहे,
तो गारवा,
शिंपडत राहे.
