Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sanjay Gurav

Inspirational


3  

Sanjay Gurav

Inspirational


एकट्याचा प्रवास

एकट्याचा प्रवास

1 min 252 1 min 252

एकट्याने प्रवास करताना

माथी आठवणींची मोळी

वेचलेले अनुभव काटेरी

उसवली तरी टिकून झोळी.


एकट्याने प्रवास करताना

चिंता सोडावी वाऱ्यावर

हव्या-नकोची करून तजवीज

मन ठेवावं नित्य थाऱ्यावर.


आला एकटाच जीव जगती

कुणी चालवतो धरुन बोटा

पंख फुटले की सुरू अविरत

एकट्याचा संघर्षाचाच रेटा.


सुखाचे वाटेकरी सारे सोयरे

दुःखाला धडक फक्त स्वतःला

ज्या हाताने वाटले भरभरून

मलमही लावत नाही कुणी वेळेला.


प्रवास एकट्याचा असला तरी

रुजवावीत मायेची रोपटी चार

अखेरच्या प्रवासाला निघताना

देतात तीच विश्रांती घटका चार.


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjay Gurav

Similar marathi poem from Inspirational