एके काळी काय घडलं
एके काळी काय घडलं
होती अंधारी काळिकुट्ट रात्र
घायगडबडीने निघाले होते घरी
पण हिम्मत होत नव्हती पहायला
चाहूल कुणाची लागतेय पाठमोरी.
धीर एकवटून चालत तशीच राहिले
पोचले घराच्या उंबरठ्याजवळ
आता मात्र पहावं वाटलं वळून
कोण पाठलाग करतय इतका वेळ,
आवरेना हसू जेव्हा पाहिलं मागे वळून
मन माझं भांबवलं माझीच सावली बघून.
