एकांत.
एकांत.
धावतोय केव्हापासून
लोकांच्या गर्दीतून,
जगतोय एखाद्या यंत्रासारखा
प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावुन,
एका घड्याळाप्रमाणेच चाललयं
सगळं आयुष्य हे मोजून मापून.
सहज वळुन पाहिल्यावर कळालं
खूप दूर निघुन आलोय मी
माझ्या खऱ्या अस्तित्वापासून,
आणि दुरावलोय किती मी
स्वतःच्या इच्छांपासुन.
हवाय आता मला एकांत
कोंडलं जातयं माझं मन
याच सार्या गर्दीत.
सोडायचं आहे रोखलेल्या
माझ्या प्रेमळ मनाला
सुसाट त्याच्याच मर्जीत.
परत यायचयं मला आता
माझ्या पूर्वरुपात,
सगळ्या गोष्टींमध्ये धुंद होणारा
कितीही मोठ्या दु:खातुन
कायमचा आनंद खेचणारा...
याच परीवर्तनासाठी
हवाय आता मला माझ्यासाठी
फक्त एकांत
