एक साधा प्रश्न
एक साधा प्रश्न
एक साधा प्रश्न माझा,
उत्तर त्याचे देशील का?
अबोलाचा तो करार तुझा,
आता तरी मोडशील का??
एक साधा प्रश्न माझा,
उत्तर त्याचे देशील का?
प्रेमांत दिलेल्या त्या वचनांना,
आता तरी जागशील का??
एक साधा प्रश्न माझा,
उत्तर त्याचे देशील का?
अधुर राहिलेल्या आपल्या गोष्टीला,
आता पूर्णत्व देशील का??
एक साधा प्रश्न माझा,
उत्तर त्याचे देशील का?
आयुष्याच्या या वाटेवर पुन्हा,
मला तू भेटशील का??

