एक दिवस
एक दिवस
एक दिवस,
अवचित असे काही घडले.
झोपलास बाळ असे शब्द कानी पडले.
मी भांबावलो आणि फार भित होतो,
कारण मी साक्षात शिवाजी महाराजांना पाहत होते.
शिव शम्भो मज वदले की,
माझ्या स्वराज्य माज हा कसा वाढला,
या महाराष्ट्र देशास तुम्ही खड्यात नेऊन गाडला.
पहिले तुर्की इराणी इंग्रज आता हे पांढरपेशी स्वैराचार करीत आहे.
व आमचा मराठी माणूस त्याची
पिकदानी साफ करीत आहे.
नंतर ते पांढरपेशांवर गरजले,
तुम्ही उपभोगता सत्ता पण या मध्यम वर्गाने सर्व काही सोसले.
कारण सिमेवर मरणारा तरून हा यांच्यातुनच येतो,
भूमातेच्या रक्षनार्थ प्राण ही आपले देतो.
हा आयुष्य भर गरीबीत थिजत असते.
म्हणून लोकशाहीत तुमची मैफिल सजत असते.
शेवटी त्यांनी मला त्याची समशेर सुपूर्द केला.
आणि या मराठ्यांच्या अस्मितेचा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला.
