Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Malini Sawdadkar

Inspirational

4.0  

Malini Sawdadkar

Inspirational

दूत मी समाजाचा

दूत मी समाजाचा

1 min
154

समाजधुरीण....मी

स्वतःस....समजते

ऋण..या समाजाचे

निश्चितच.....मानते //1//

मला.....शिकविलेय

हे माझ्या संस्कारांनी

देता येईल........ते दे

इतरां.......दो करांनी //2//

समाजाची...आजची

गरज.......हीच आहे

परंपराही.......माझी

खरी....अशीच आहे //3//

माझी....सावित्रीमाई

जिचे...कार्य अजोड

उतराई........अंशतः

व्हावंसं वाटे....थोडं //4//

जिजाऊ माझी आऊ

युगप्रवर्तक.........ती

अन्यथा....धर्म माझा

नसता हो.....सांगाती //5//

जेवढे आहे......शक्य

तेवढे..........योगदान

देण्याचा निर्धार.....मी

केलाय.........मनोमन //6//

दूत......या समाजाची

मी......निश्चितच आहे

परी.....योग्य संधीच्या

मी...प्रतिक्षेत.....आहे //7//

देवा,.........देई रे बळ

मला...तू...ह्याचसाठी

माझ्या.....मनोरथाची

होईल का रे.......तुष्टी //8//

Rate this content
Log in