तुझी चाहूल
तुझी चाहूल
1 min
151
पैंजणांचा सुमधुर नाद
देतो तवागमनाची वर्दी
मी अनुरक्त आहेच सखे
त्या रूणझुणीचा मी दर्दी //1//
तव सुकोमल पाऊलखुणा
माझ्या काळजात बंदिस्त
त्या पाऊलातील पैंजणरव
कर्णी घुमतो, जरी निर्दिस्त //2//
तुझा रुसवा, फुगवाही सखे
आपसूक पैंजणास गं कळतो
अन मग तुझा अबोला सखये
मम हृदयाला छळ छळ छळतो //3//
जेव्हां तू आनंदीत असते राणी
पैंजणांची कीणकीण आनंदी
अन तुझा मी मनकवडा राजा
तुझ्या लोभस रूपड्याचा छंदी //4//
जर पैंजण नसतील पायातच
तुझा पदरव अबोल होईल गं
अन मग तुझी ती मुकी स्पंदने
माझे काळीज कसे साहिल गं //5//