Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Malini Sawdadkar

Others

4.0  

Malini Sawdadkar

Others

माझा गांव

माझा गांव

1 min
175


अजूनही स्मरतो बालपणीचा

गावाचा पार मज नवलाईचा


त्या पारावर मिळून साऱ्यांनी

कैक मिटवली तेव्हा गाऱ्हाणी


खेळ असो वा असो अभ्यास

पारावर चर्चा चाले तासनतास


कुणा एकावर कधीच आम्हीही

अन्याय तेवढा होऊ दिला नाही


आई बाबांना नसे कशाचा पत्ता 

आमचीच ती अनभिषिक्त सत्ता


वेशीवरील वडाचे झाड पुरावा

त्याचा आमच्याशी नसे दुरावा


नागपंचमीच्या झोक्यासाठीच

त्याचीही फांदी असे राखीवच


जीबली, लंगडी, खो खो सारे

खेळ आमचे जणू त्याला प्यारे


गर्मी जाणवता त्याचीच पाने

सावली धरायची अती प्रेमाने


त्याच्याशी अनुबंधीतच सगळे

अजून मिळवतो बुंध्याशी गळे


घरामागची पाटलांची आमराई

अजूनही त्या चवीची सय येई


आंबटगोड कैरीच्या चोरीसाठी

पाटीलकाकांची आठवे काठी


पळण्याची शर्यतीत जो माघारी

कान पिळून काका द्यायचे कैरी


चैत्र आषाढीला व्हायची चंगळ

यात्रेतील फुगी, खेळणी, दंगल


महादेवाच्या मंदिरी फक्त हजेरी

प्रसाद म्हणुनी व्हायची न्याहारी


पैनगंगेचे खट्याळ निर्मळ जल 

अजून स्मरे तो स्पर्श सुकोमल


गेले ते दिवस,उरल्या आठवणी

उपक्रमे उजळल्या पुनश्च मनीं


वाटे, फिरून एकदा व्हावे सान

उपभोगावी तीच अमूल्य शान


Rate this content
Log in