Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Malini Sawdadkar

Classics

4.0  

Malini Sawdadkar

Classics

वेड्या मना

वेड्या मना

1 min
149

वेड्या मना, मज सांग ना

कधी तू होशील शहाणा

स्वप्न मनातले तुझ्या, नको

ओठांवरती आणूस ना //1//

त्या स्वप्नांना पंख जर, हवे

असतील रे तुजला

ते तूझें तू लावून घे, नंतर 

बांध स्वप्नांतला बंगला //2//

स्वप्ने वास्तवात आणतांना

मन वेडंच लागतं

पण व्यक्त होताना मात्र ते

शहाणपणानं वागतं //3//

वेड्या मनास ना कळे ती

शहाणपणाची रे भाषा

शहाणं होताच वेड्या मना,

तू गुंडाळ तुझा गाशा //4//

शहाणपण-वेडाच्या द्वंद्वात,

तुझं होईल रे मरण

म्हणूनच तुला मी सांगते, 

तू आत्ताच रच सरण //5//

वेड्या मनाला नच लाभले,

कधीही दीर्घ ते आयुष्य

शहाणपणाला शरणागत ते,

हेच पदोपदी दृश्य //6//

Rate this content
Log in