हिरवं सपान डोळ्यात
हिरवं सपान डोळ्यात
1 min
137
काळ्या मातीत धन्याची
चालली तिफण
कणसं दाण्यांनी भरता तोच
चालवी गोफण //1//
मग सोंगणी होऊन दाणे
जातील खळ्यात
तोवर लपंल हे माझ्या हिरवं
सपान डोळ्यात //2//
आता यंदा तरी देवा, माझं
सपान फुलू दे
माझ्या धन्याचं मन बी, जरा
सुखानं डोलू दे //3//