Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Malini Sawdadkar

Abstract

4.0  

Malini Sawdadkar

Abstract

सरत्या वर्षाला निरोप देऊ या

सरत्या वर्षाला निरोप देऊ या

1 min
170


गत वर्षाला निरोप देऊन

नववर्षाचे करू या स्वागत

संकल्प करू या त्याप्रित्यर्थ

आणि पूर्णही करू संकल्पाप्रत //1//


संकल्पांची यादी मोठी,त्यातून

संकल्प कोणता आधीच ठरवू

ज्यायोगे लाभे इतरांना आनंद

अशाच उद्दिष्टांचे ब्रीदही मिरवू //2//


मानवप्राण्याची शक्ती अपार

तो कधीच नाही मानत हार

ठरविले तर तो पाषाणालाही

फोडून काढू शकेल जलधार //3//


अमर्याद व्याप्ती तये बुद्धीची

त्याची कल्पनाशक्ती बेसुमार

तिला वापरून करू शके तो

जनहीतकारी योजना तयार //4//


मरावे परी कीर्ती रूपे उरावे

हेच असावे आपले गंतव्य

त्यानुसार संकल्पही असावा 

ना करता वेळेचा अपव्यय //5//


सर्वप्रथम लागतो देशाचे देणें

देशातील कुप्रथाच हटवा

जात-पात हा भेद नसावा

या भेदाला त्वरीत मिटवा //6//


लोकांभिमुख कार्ये करूनी

बना त्यांच्या गळ्यात ताईत

भ्रष्टाचार निर्मूलनाचे उद्दिष्ट

ठेवूनी भ्रष्टांना गाडावे खाईत //7//


गरीब असती बहुसंख्य इथले

त्यांना मदतीचे द्यावे सांत्वन

आजपावेतो ऐकून कंटाळती,

मतलबी नेत्यांचे ते आश्वासन //8//


कोण म्हणतो की छिद्र पाडणे

आहे मुश्किल त्या आभाळाला

एक दगड उचलावा,निर्धाराने 

आणि भेदावे कळी काळाला //9//


ठाम असावी आपली भूमिका

आणि सुस्पष्ट असावे ध्येयाप्रती

राबवाव्या प्रायोजित संकल्पना

ज्या ज्या मनोमन घेतल्या हाती //10//


अशा प्रकारे उदयाला आणावा

थोरांच्या स्वप्नांतील तो भारत 

पूर्ण करावे देशास्तव कर्तव्यास

मिळेल असीम आनंद तुम्हांप्रत //11//


कास बाळगा सत्य अन प्रेमाची

चाड धरा न्याय्य नितीमूल्यांची

ही आयुधे असता तुमच्यापाशी

मूर्तीच ठराल तुम्ही कैवल्याची //12//



Rate this content
Log in