वि ज या द श मी
वि ज या द श मी
शमीची तेजस्वी पाने ठेवली जातात घरात I
आप तत्वांची आपट्याची पाने ते तेज शोषतात II1II
महादोष निवारक आहे आपट्याचा महावृक्ष I
कितीही फांद्या तोडा तो कधीच होत नाही रूक्ष II2II
आप तत्वाकडून तेज तत्वाची देवाणघेवाण I
ह्यातून जाणवतो पूर्वजांचा ज्ञानसिंधू महान II3II
झेंडूची फुले तर आयुर्वेदिक गुणकारी I
त्यासाठी तोरणांचा मान त्यांना घरोघरी II4II
पिवळी केशरी आकर्षक आल्हाददायी फुले I
ह्यांना नजरेसमोर बघताना मन आनंदाने डोले II5II
कुंकू आणि अक्षतांचं महत्व सर्वांनाच विदित I
शुभ कार्यात ह्या दोहोंची उपस्थिती शब्दातीत II6II
दसरा म्हणजे विशेष साडेतीन मुहूर्तांपैकी एक I
रावणसंहारक रामविजयकथा म्हणूनच उल्लेख II7II
ह्या स्फूर्तिकथा नेहमीच राहाव्या स्मरणात I
नवरात्रीनंतर हा दिनविशेष त्यासाठीच पुराणात II8II