STORYMIRROR

Malini Sawdadkar

Romance

3  

Malini Sawdadkar

Romance

विरह

विरह

1 min
221

मान्य आहे मला कि तू सिमेवर

तुझं कर्तव्यच बजावत आहेस

पण वेड्या त्या वेडात मला का

विसरायला धजावत आहेस


मी केवळ तुझ्या आठवणींच्या

बळावरच तर सारं निभावतेय

आणि ह्या मावळत्या सूर्यालाच

फ़क्त ह्रुदय उलगडून दावतेय


घरी तुझे व्रुद्ध आई-बाबा माझ्या

डोळ्यातील अश्रूंनी धास्तावतात

म्हणून ते अश्रू परतवायला मग

माझे पाय ह्या डोहाकडे धावतात


तुझ्या धाकटया बहीणीच्या डोळ्यात

मला हल्ली जोडीदाराचे स्वप्न दीसते

तिच्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी 

तू यावंस म्हणून वाट बघत बसते


लेकरं दिवसातून हजारदा विचारतात

आमचे बाबा कधी येणार गं आई

मला वाटतं या ढगाकडून हा सांगावा

कळेल तर तू करशील येण्याची घाई


रोजचं आयुष्य काट्याच्या आणीवर मी

जगतेय रे सख्या ह्याच एका काळजीत

‘माझ्या कुंकवाच्या धन्याला सुखी ठेव

मागणं मागते देवाला’ पण मीच आशंकीत


त्या भेड्सावणार्या जिवघेण्या शंकाही कुठे 

व्यक्त कराव्या नाहीच मला मुळी कळत

मग मन ओढ घेतं या स्थळी - जिथे बसू

शकते - मीच मला, प्रेमवेडीला कुरवाळत


ह्या विरहाचे गीत तुलाच वाटते ऐकवावे

कारण या विरह वेदना तुलाच तर उमगतात

तूच खरा माझ्या सुखदुःखाचा साक्षीदार

म्हणून माझे पाय आपसूक इथं धाव घेतात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance