Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Malini Sawdadkar

Others

4.0  

Malini Sawdadkar

Others

असे घडावे

असे घडावे

1 min
114

अजूनही आठवतेस उभी

माझ्या प्रतिक्षेत तू दाराशी

समोर मी दिसताच, आई

घट्ट कवटाळायचीस उराशी //१//

आता पुन्हा ती मिठी मला

कधीच नाही मिळणार गं

हे सत्य असूनही मला ते

स्वतःला कधी कळणार गं //२//

पुनर्जन्म घे ना आई

परत ये गेल्या पावली

कदाचित त्यामुळे लाभेल

आम्हांस पुन्हां तुझी सावली //३//

तुझा संगमरवरी पुतळा

ठेवलाय तुझ्याच मंदिरात 

मग आठवण येतां तुझी मी

शोधतेय तुला त्या पुतळ्यात //४//

पण तू गवसतच नाहीस

तुझी ऊब त्या स्पर्शात नाहीच,

काही केल्या उद्विग्नता नाही 

संपत...छे!सुचेना काहीच //५//

असे वाटते,असे घडावे काटे 

घड्याळाचे उलटे फिरावे

मी तुझ्या मिठीत विसावावे

व काट्यांनी फिरणे विसरावे //६//

Rate this content
Log in