STORYMIRROR

Malini Sawdadkar

Children Stories

3  

Malini Sawdadkar

Children Stories

ऐरणीच्या देवा

ऐरणीच्या देवा

1 min
204

ऐरणीच्या देवा, तुझी 

ठिणगी ठिणगी हसू दे

विझलेल्या भात्यापाशी 

मज अभ्यासाला बसू दे


शब्द शब्द जोडून भारी

गृहपाठ मी संपविला

शेरा घेईल अत्युत्तम च

खात्री आहे ही मला


टीचर माझ्या खूप कडक

आळस त्यांना न चाले

म्हणून आईबाबांच्या 

कामा सोबत बुक पूर्ण मी केले


आता आईपण पाठ थोपटेल

माझी खूपच प्रेमाने

कारण ती जाणतेच गृहपाठ

असतो माझा नेमाने


बाबादेखील पापा घेतील 

अश्रू लपवून डोळ्यात

मग मीही झोकून देईल

स्वतःस त्यांच्या गळ्यात


Rate this content
Log in