STORYMIRROR

Rajesh Sabale

Inspirational Others

4  

Rajesh Sabale

Inspirational Others

।।दुष्काळ एक समस्या।।

।।दुष्काळ एक समस्या।।

1 min
146

अहो कारभारी आपल्या शेतामधी, कवा पाऊस पडायचा हाय।

चार वरस झाली आपल्या लग्नाला, तरी जमीन उताणी हाय।।

नाही चारा पाणी, फिरते अनवाणी, गुरा-ढोरांचं करायचं काय।

धरणं तलावातूनी गेलं पाणी आटून, मुलं-बाळांनी खायचं काय।।१।।


मी सांगते धनी नका कर्ज काढू, या पावसाचा भरवसा काय।

मोल मजुरीन काही दिवस काढू, पर मनं खाचायच नाय।।

आपल्या लग्नामधी भर मंडपांमधी, तुमी शपथ घेतलेली हाय।

सात जनम मला तुम्ही सोबत घेऊन, संसार करायचा हाय।।२।।


सुख- दुःख सारी आपल्या जीवनामधी, अशी येणार जाणार हाय।

जरा दम काढू, थोडं सहन करू, पण मनात कुडायच नाय।

दिस हे बी जातील, नवी पीक येतील, कालचक्र हे फिरणार हाय।

जरा दम खावा थोडा इचार करा, देव बाप्पाला काळीज हाय।।३।।


त्यांच्या मनामधी दडलं काही तरी, तवा येळ काळ चुकलेली हाय।

एवढी दुनियादारी आपल्या घेऊन शिरी, तो उगाच चालायचा नाय।

असलं आपल्यावणी त्याची थोडी तरी, काही तरी मजबुरी हाय।।

म्हणून म्हणते धनी, उगा येड्या परी काही-बाही करायचं नाय।।४।।


जसं जमलं तसं, जसं मिळल तसं, आपण जीवन फुलवायच हाय।

नका भडकून जाऊ, वेडंवाकडं ऐकून, जरा जपून चालायचं हाय।।

बायको पोरं सोडून, माय-बाप तोडूण, दूर कुठं जायचं नाय।

सांगून ठेवते धनी, काही झालं तरी, आत्महत्या करायची नाय।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational