STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational Others

3  

Supriya Devkar

Inspirational Others

दुसरे बालपण

दुसरे बालपण

1 min
261

हातामधली काठी सोडून

वाटते मज पळावे आता

लहानपण पुन्हा यावे

जगावे जीवन गाता गाता॥१॥


नको चिंता नको व्याधी

वाटते मज उंच उडावे

सूर पारंब्या खेळताना 

 झाडावर मी उंच चढावे॥२॥


डोंगर टेकड्या चढताना 

वाऱ्याशी स्पर्धा करावी 

पारंब्याचे झोके घेत 

बालमने पुन्हा स्फुरावी॥३॥


कवळीच का असेेेेना दाताची 

कैरीची चव चाखावी

पेरू चिंचा बोरासोबत

बालपणीची आठवण गाठावी ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational