STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

4  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

दुर दुर।

दुर दुर।

1 min
460


ओले चिंब चहुभोवताल।

जसे धुक्यांचे ओले, पडले सभोवताल।

निघाली पृथ्वी चराचरातून,न्हाउन माखून

आणि नटली नववधूप्रमाणे

हिरवा, शेवाळी शालू ओढून- १

येता नभी मेघ दाटून

सरसर बरसता सरी, बाहेर अंगणी

सभोवतालील हे जग जाते हरवून

आणि केवळ मी ऊरते

अल्हड,खट्याळ वाऱ्यासह पावसासोबत- २

हे धुकेरी वारे लक्ष माझे गेले वेधून

कौलारु छतातून निघणारा तो शांत धुर

चालला होता मंद पण डौलात

आणि दुर पेटत असलेली ती शेकोटी

देवून गेली उब, मला मलमलच्या दुलईतील-३

दाराच्या चौकटीने पाय ठेवले

आत मधेच बांधून

बाहेर मात्र धो धो बरसत्या सरी

आणि मेघांची गडगडाट

घेवून जाते मनाला धारांसह वाहवून दुर दुर।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational