दुःख आणि मी
दुःख आणि मी
माझ्या डोळ्याआड दडलेलं दुःख
कोणालाच दिसत नव्हतं
रोजच भेटणाऱ्या जखमांना
फक्त वाहायचं माहित होतं
त्यावर मलम कोणाकडेच नव्हता
मिठाचा ओलावा सगळ्यांकडेच होता
आग तर खूप होत होती
पण सांगता कोणालाच येत नव्हती
खचून गेलो होतो पूर्ण
अंधारल्या होत्या वाटा
वाटलं कुठेतरी नक्कीच भेटेल
आशेचा किरण छोटा
शेवटी माझ्या लक्षात आलं
सगळं संपलं असं जेव्हा वाटतं
त्याचवेळी सुरुवात होऊन
अपेक्षेपेक्षा जास्त काही भेटतं
