STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

5.0  

गोविंद ठोंबरे

Inspirational

दर्दी-बेदर्दी...

दर्दी-बेदर्दी...

1 min
27.3K


दर्दी,बेदर्दी काय असते

पाहायला ये वावरात

अन तहानलेल्या पिकाला

थेंब दाखव आभाळात


भाकरीची चव काय असते

विचारायला ये झोपड्यात

पाण्यात चुरून खाताना

दोन घास बांधून ने बंगल्यात


फाटक्या गोधडीत झोप येते का

निजायला ये अंधारात

उषाखाली दगड घेऊन

पोरगी उजवून दाखव समाजात


कष्टाचं चीज गमवायला

नांगर धरून पहा हातात

विकून दाखव जोंधळं सारं

कवडी मोलाच्या दामात


फाटकं लुगडं नेसवून बायकोला

सुखाचं जीनं दाखव संसारात

पोरगं पोटाला हुशार असलं तरी

जुंपून दाखव त्याला शिवारात


एकदा गाव खस्ता बघायला

पायताण काढून चाल बाजारात

लेकराच्या जिलबी भज्यासाठी

उपास घडवून दाखव भर उन्हाळ्यात

उपास घडवून दाखव भर उन्हाळ्यात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational