दोस्ती....!!
दोस्ती....!!
नच कळे मज मी कोण आहे
रेगीस्तानची वाळू की
द्रमूक मधली माती
मोती बागेतली कोल्हापुरी छाती
दिल्लीची धुंद गल्ली की
आसामची गलियारी
मी मी नाही इतके नक्की
तरी पण बाण उरात शिरती
शर शय्येवर बसण्यापूर्वी
हासत हासत सारे पचवितो
दोस्तीसाठी जान देतो
स्तिमित होऊनी रयतेसाठी बचत ही करतो
छाटणी खर्चाची करुनी
नकळत एकसारखे कपडे घालून
दोस्तीची नवी पायाभरणी करतो
चलते चलते मेरे ये गीत याद रखाना
म्हणतच मैत्री निभावतो ....!!
