STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

दिवटी भोजन...!

दिवटी भोजन...!

1 min
28.3K


आज कोजागिरी पौर्णिमा पण ढगाळ वातावरणामुळे चन्द्र दर्शन नाही..

आणि म्हणून मला बालपणीचे दिवटी भोजन आठवले.


दिवटी भोजन....!!!


एकदा काय मजा झाली

बाल मंडळाची सभा भरली

चांदणी भोजनाची

सुरेख कल्पना पक्की ठरली


दुपार पासून तयारी

साऱ्यांनी मनापासून केली

प्रत्येकाने जमावा जमाव

भलत्या उत्साहात केली


आई बाबा परगावी

मग परवानगी कशास हवी

शक्कल लढवली होती नवी

जी वाटली सर्वांना हवी


साडे सातलाच सारे

अंगणात जमा झाले

डबे मांडून सतरंजीवर

चंद्राची वाट पाहू लागले


साडे नऊ वाजले तरी

चंद्रोबा काही नाही आले

पण आई बाबांचे मात्र

वेळेवर अचानक येणे झाले


पसारा पाहून आश्चर्य

आई बाबांना वाटले

त्यांनी आमचे खरच

लाडे लाडे कान धरले


चन्द्र राहिला बाजूला

पण चांदण्या आल्या

काना खाली जाळ निघता

अमावश्येलाच चमकल्या


धडधड वाढली उराची

धांदल उडाली मित्रांची

तेवढ्यात बाबा आले

येताना हातात दिवटी घेऊन आले


आईच्या प्रेमाला सहज

अचानक पाझर फुटला

दिवटी भोजनाचा घाट मजेत

लिंबू लोणचे पापडासह पार पडला


आजही चांदणे पडले की

आमवश्याच आठवते

दिवटी भोजनाचे स्वप्न

वरचेवर अजूनही भेडसावते.....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational