दिवाळी
दिवाळी
विसरूनी दुःख सारे
करू साजरी दिवाळी
झोपडीत लावू दिवे
आरास हो पणत्यांची
अभ्यंगयुक्त पहाट
नव्या कपड्यांचा थाट
मुलेबाळे आनंदात
पाहून डोळे पाणत
एकमेकांची आवड
मुलांचा किलबिलाट
फराळाचा सारा घाट
मिळून केला तयार
छकुलीने लाटी केली
नकाशाची पुरी झाली
ताईचा ग अनारसा
कढईत गं हसला
राग द्वेष नाही थारा
आप्तजन येती घरा
फराळाच्या चवीसम
तिखट गोड ना दूूूजा
झगमग फटाक्यांचा
जणू चांदणेे शिंपिले
कंदीलात समेटून
अंगणात विखुरले
तुळशीचे लग्न होता
दिवाळी संपून जाते
आठवण सणाची त्या
दीप बनून तेवते